"का …………………?"
अडकवूनी मैत्रीच्या जाळ्यात
का रे सोडून गेल्या अर्ध्या वाटेवर
मन माझे अजूनही वाट पाहत आहे
तुझ्या परतीच्या आशेवर
डाव माझा मी पार केला
पण तू तर अर्ध्यातच सोडून दिला,,
मनातही मी विचार नाही केला पण
अचानक का रे तू दगा दिला,,,,,
सोडून गेला तू साथ माझी
तरीही वाटते तू अजूनही आसपास
माझ्या कोमल हृदयाच्या कोपऱ्यात
कुठेतरी तुझा अजूनही निवास
सदा न कडा तुझाच विचार
खरे तर तुझ्या विना मन माझे
उरलेला फक्त विरहाचा प्रहार
त्याच संगे तुझ्या स्मित आठवणींचा मोहोर
का केला माझ्या मनाचा असा छळ
तरीही माझे नाते होते प्रेमळ
तू नसताना माझ्या जीवना मध्ये
हे जगही वाटे आता मज विरळ