Friday, 17 October 2014

खरंच माझा होशील काय ?

            



मी  तुला कधीच विचारणार नाही 
सांग  माझा होशील काय 
पण माझ्या मनात का आधीच 
तू  घर करून  बसला  आहे 

तुला मी कधीच सतावणार नाही 
माझ्यासोबत एकदा तरी बोल 
कारण तुझे हे  मुके बोल च 
माझ्याशी कितीतरी गप्पा मारत असतात

कधीच तुझ्या  मागे लागणार   नाही 
तू माझ्याकडे हि लक्ष दे जरा
पण माझ्या अंतरंगाचे लोचने 
फक्त  आणि फक्त  तुलाच पाहत असतात

मी कधीच म्हणणार नाही तुला
सतत माझ्या सामोरी राहा 
तुझे ते ओजस्वी हास्यच माझ्या 
नयनपटलावर झळकत  असते 

आताही डोळे बंद  केले कि  तुझ्या 
सावळ्या निरागस चेहऱ्यावरील स्मित हास्यच दिसते 
नेमके काय होते ते मलाही कळत नाही
न त्यातच मी स्वत: ला हरखून बसते

बघ आता  तूच सांग एकदाचा 
तुला विचारू कि नाही मी ?
तू खरच माझा होशील काय ?
कि फक्त मनातच घर करून राहशील ?
            
                              अश्विनी अवतारे,नागपूर




5 comments: