"प्रेमाचा पाऊस"
मन माझे आज आतुर आतुर
लागली तुझ्या आगमनाची हुरहूर
नजर माझी तुझ्या परतीच्या वाटेवर
कदाचित आतातरी तू परत येणार
डोहात बुडाले मी तुझ्या आठवणींच्या
वारा अजूनही वाहतो तुझ्यासह घालवलेल्या क्षणांचा
तुझ्या त्या ओझरत्या नकळत स्पर्शाचा
तुझ्या संगे पाहिलेल्या अगणित स्वप्नांचा
तू न बोलला मी परी अबोल
जरी ते नाते होते अनमोल
मज वाटले तुझ सांगावे त्याच क्षणी
पण मुके का पडले माझे बोल ?
न कळले कधी तू मज सांगून गेला
तुझ्या अबोल नजरेने मला कौल दिला
आताही मी त्याच आशेवर जगत आहे
तू जवळ नसताना हि क्षणोक्षणी जवळ भासत आहे
वाटले नाही कधी आपण दूर व्हावे
नसताना जवळ फक्त स्वप्नात एकमेकांस पाहावे
साऱ्यांना एक गोष्ट नक्की सांगावी वाटेल
एकदा तरी प्रेमाच्या पावसात भिजून पाहावे
अश्विनी अवतारे,नागपूर
chan
ReplyDeletety tai
ReplyDelete