Wednesday, 15 October 2014

मी कोण ?

                                           " मी कोण  ? "


मी वाहिनी , मी मानिनी
मनमोहिनी ,नि दामिनी,
मी रोहिणी , मी गजगामिनी,
मी हिरकणी,रणरागिणी,,,,,,,,,,
पण मी कोण,,,,,,?


सोसते मी  अबोल राहून
मी गिळते अश्रू पिऊन 
चालते मी ओझे वाहून ,,,,,,,,,,,,
पण,,,,,,मी कोण …?


वाहते संसार मी घालून कांकन 
नाचते मी जगासमोरी बांधुनी  पैजण 
चालविते कारभार जगाला पाहून 
तरीही मनी हा प्रश्न ……मी कोण?


वाट चालून चालून न थकले मी आजपरी 
संसाराचा गाडा  घेऊन डोईवरी 
दगड फोडी माझ्याच  माथ्यावरी
संकट ओढवून उर्वरी घेऊन आण 
पण तरी हि,,,,,,,,मी कोण,,,?
मी कोण,,?


अश्विनी अवतारे,नागपूर

5 comments: