Friday, 4 April 2014

                          "वळण"
आज आला का विचार मनी
सुन्न का पडली माझी वाणी
ऐकून तुझे शब्दसूर कानी
प्रीतीची फुले वेचतानी,,,,,,,,,

सारे जग का हे बेभान वाटे
जुडती काही नवीन नाते
साऱ्या  जगाला या  विसरून
मन एकांतांत गाणं  गाते,,,,,

आयुष्यातले हे वळण कसले
प्रित  जलाने  न्हाऊ घातले
प्रितीचे  हे पाणी मनोमनी रुजले
सोडुनिया जगास एकटेच  भिजले,,,,,,,,,,,

का होत असे मन असे वेडे
गर्दीतही का हे एकटे पडे
का कधी कुणातरी साठी
मन एकांतात रडे …………….

2 comments: