Saturday, 23 May 2015

माय बाप

माय बाप 
माय बाप  , शब्दातच किती आपुलकी जाणवते 
मला हि अनुभवायची  आहे हि आपुलकी 
ते प्रेम ती काळजी , फक्त काही क्षण 
आणखी जगायचे आहे, काही क्षण आणखी 

इतके भरगोस प्रेम दिले मामीने 
कि मे ,, तुझ्या ममतेची कधी जाणीवच झाली नाही 
बापाच्या रागाचाही विसर पडला कधीचाच 
जेव्हा मामांच्या काल्जीनेच उरत भरून येत  असे 

परक्यानीच  सांभाळले इतके कि 
मायबापाच्या सहवासाची कधी गरज वाटली नाही 
शब्द रूपाने इतकी बोलकी झाली पण 
आई बाबा कधी स्वत : हून ओठांवर सजलेच नाही 

पडले कि आ म्हणून ओरडायची पण
अंतर मनातून आई हि हक कधीच बाहेर पडली नाही 
घाबरले कि बास  झाले  म्हणून स्वत: ला समजवायची 
पण बाबा तुम्ही हवे आहात असे कधी वाटलेच नाही 

माय बाप , आई बाबा बाराखडीत शिकले 
शब्दरूपात कवितेत रंगवूनही आणले 
पण कधी माझ्या अंतरंगातून झळकलेच  नाही 
आई बाबा असे कधी तोंडावर आलेच नाही ,
ते तसेच कवितेत उरले ...अश्विनी अवतारे,नागपूर

No comments:

Post a Comment