Saturday 23 May 2015

आई परत तुझ्या कुशीत यावेसे वाटते

आई परत  तुझ्या कुशीत यावेसे वाटते

लहानपणी  बाराखडी  शिकताना 
आं  म्हणजे  आई हे  शिकले खरे ग
पण कुणी अर्थच नाही सांगितला
काय असते आई म्हणजे , मला कळलेच नाही 

जशी जशी मोठे होत गेले 
आई शब्दाचा अर्थ उलगडत गेला 
पण फक्त शब्दाचा अर्थ कळला 
नाते संबंध  मात्र समजण्या पलीकडे च राहिले 

आई कळली कुठे तरी तिच्या सोबतचे नाते हि कळले 
ती असूनही मात्र तिचा सहवास नव्हता 
शब्द पलीकडे कडे हि काही  अर्थ होता या नात्याला 
एवढा समंजस  पणा यावेळी   माझ्यात आला होता 

आता पर्यंत नाही भेटला ग तुझा सहवास 
अजूनही मी अज्ञात त्या तुझ्या ममतेला 
म्हणून कधी एकांतातही  अश्रूंची  धार 
लागते माझ्या असुर्लेल्या डोळ्यांना 

आज खरच डोळे  मिटून  अलगद 
तुला हलकीशी  मिठी मारावीशी वाटतेय 
तुझ्या ममतेच्या ओघात  वाहून जावेसे वाटते 
आई… आज खरच तुझ्या कुशीत निजावेसे वाटते..अश्विनी अवतारे,नागपूर

No comments:

Post a Comment