Saturday, 2 May 2015

नशिबाची थट्टा

मला माझ्याच  नशिबाची च भीती वाटत  
कारण प्रत्येक वेळी काय डोळ्यासमोर येईल 
आणि परिस्थिती माझी कशी परीक्षा  घेईल 
याचा  मी कधी  अचूक नेमच लावू  शकत  नाही 

कदाचित नशिबाचे नकाशे आतून अधिक
 उलगडत जातात ज्याची कुणालाही  खात्री नसते 
सगळे मार्ग स्पष्ट  दिसत असूनही एवढ्या संघर्षात
वाट न डगमगता चालून जाण्याची अपेक्षा नसते 

कुठल्याही चाहुली  विना इतके काही घडत जाते 
ऐन वेळी कोरडे किनारेही वादळाला फितूर होतात  
प्रश्नात प्रश गुंत्यात गुंता इतका वेढला जातो
उत्तर मिळूनही  हातात मात्र  काही उरले  नसते

नशीब का अशी थट्टा  करत  असणार  माझी 
वेळोवेळी तोंड देऊनही समोर संकटे घेऊन येते
मी संकटात पडते कि संकटेच मला शोधतात ?
मग संकटानाच सोबती करून मी वाट धावून जाते .
................ अश्विनी अवतारे,नागपूर

No comments:

Post a Comment