Tuesday, 19 May 2020

दीनव्यथा



          
   अजानपने चालत आहे मी कुठे
रस्ते काही केल्या संपत नाही
एकटक पाहुनीही धुक्या पलीकडली
वाट काही दिसत नाहीं

मोडली ती घरें स्वप्नांचि
तुटली का तोरणे दाराची
विस्कटली घडी ह्या आयुष्याची
भेगाडली नाडी अनवाणी पायांची

मिळकत होती थोडी फार
पण आता ती शुन्या पालिकडे गेली
घराच्या अंगणात पोहोचण्याआधिच
जिंदगानी कर्जबाजारी  झाली

मी विचारलं तर सांगाल का हो मला
ही दीनव्यथा माझीच का झाली
ह्या धरणीत मी माझे भविष्य मांडले
तिथ कुणालाच कशी माझी कीव नाही आली ???

अश्विनी अवतारे,नागपूर