" वास्तव्य "
रूपकाची पाने ,सोन्याची फुले
प्रेमाची लहर अन मंद मंद झुले
धरतीची रजई ,आकाशाचे छत
जीवनाचा खेळ ते सत्याची प्रत
पहाटेच स्वप्ने ,,स्वप्नांना जपणे
नशिबी यावी गडलेली रत्ने
काटा रुतणे वाटच चुकणे
नात्यांची ओळख ती रत्नाची पारख
आनंदाची बाग ,सर्कशितला वाघ
संगीतातील राग जीवनाचा भाग
आयुष्याचे पान अर्थच विराण
आज उधारी उद्या गहाण
हातात फुल कधीकधि काडतुसे
काल दवे आज दाट धुके
शब्द शब्द वेचून घे
न जाने आज बोल उद्या मुके
सत्याच्या नजरा प्रेमाचा गजरा
अबोल्यात अडखळतो प्रीतीचा मुजरा
वास्तव्याची भान ,,जगण्याची जाण
क्षणोक्षणी मन करी बलिदान ..अश्विनी अवतारे,नागपूर
रूपकाची पाने ,सोन्याची फुले
प्रेमाची लहर अन मंद मंद झुले
धरतीची रजई ,आकाशाचे छत
जीवनाचा खेळ ते सत्याची प्रत
पहाटेच स्वप्ने ,,स्वप्नांना जपणे
नशिबी यावी गडलेली रत्ने
काटा रुतणे वाटच चुकणे
नात्यांची ओळख ती रत्नाची पारख
आनंदाची बाग ,सर्कशितला वाघ
संगीतातील राग जीवनाचा भाग
आयुष्याचे पान अर्थच विराण
आज उधारी उद्या गहाण
हातात फुल कधीकधि काडतुसे
काल दवे आज दाट धुके
शब्द शब्द वेचून घे
न जाने आज बोल उद्या मुके
सत्याच्या नजरा प्रेमाचा गजरा
अबोल्यात अडखळतो प्रीतीचा मुजरा
वास्तव्याची भान ,,जगण्याची जाण
क्षणोक्षणी मन करी बलिदान ..अश्विनी अवतारे,नागपूर