Tuesday, 7 April 2015

स्वप्नफुले






न उमजे  हे  प्रेम  मला कधी 
कसे असे  होऊन गेले  
स्मित  हास्याने  गाल गुलाबी  होऊ  लागले  
लज्जेने  डोळे  हि माझे झुकू लागले 

वारा  आला पान  हलले तरी 

तुझा स्पर्श भासवून गेले 
नजरेच्या आशेने तव स्पर्शाने 
जीवन माझे मोहरून आले 

दोन हृदयाचे हे नाजूक  धागे 

कधी गोफ गुंफण्या सहज जुळू लागले 
मन वेलीवर देत्हो देठी मग 
स्वप्न फुले प्रीतीची फुलू लागली

चांदण्याच्या लखलखात जणू

माझ्या पदरी पडू  लागला 
प्रेम वेडा जीव हा एकमेकात 
मग विसावू लागला .....अश्विनी अवतारे

No comments:

Post a Comment