Thursday, 14 January 2016

तिची गोष्ट




तिची गोष्टच काही न्यारी होती ।
उन्हात चांदणे पसरावी न् गुलाबी हवेत स्वतःला झोकुन द्यावे 
इतकी ती भाबडी न् प्यारी होती ।।


एखाद्या राजकुमारी प्रमाणे होती तिची स्वप्न 
जगण्यातल्या त्रासातही त्या स्वप्नांना जपणं ।
काहातरी वेगळे होते तिच्या जगण्यात 
आयुष्यच गेले तिचे जगण्याचे कोडे उलगडण्यात ।।


कुणालाही हलकीशी भुल पाडा़वी 
असले सामर्थ्य होते तिच्या बोलक्या डोळ्यात
छोट्याश्या फुलपाखराप्रमाणे जगुनही 
पंखाविना गगनात विहरण्याचे तिचे ध्येय होते ।।


बघायला गेलें तर फक्त ती एक गुलाबाची पाकळी होती ।
किंतु रातीच्या काळ्याकुट्ट तारांगणेत 

रूपेरी चमकणारी आकाशगंगेच्या

 पहिल्या नक्षत्रासारखी ती तु  होती ।।

अश्विनी अवतारे