मज सांगुन गेला काही
नजरेच्या भाषेतुन थोडी गतजन्माची
ओळख देऊन गेला काही ।।
कदाचीत इतकी शब्दात गुंतलेली मी
तुझ्या चेहरयावरचे भाव मात्र वाचता आले नाही
पण तुझ्या डोळ्यातील ते तेज आणि
ओठांवरचे गुलाबी स्मितहास्य माझ्यापासून लपले नाही ।।
तुझ्या त्या लाघवी हसण्यानेच
कदाचीत मी विरघळली खरी
क्षणभर वाटून गेले तुझी नजर
फक्त मला बघण्यासाठीच झाली होती बावरी ।।
एखादं स्वप्न पहावे आणि
स्वप्नातला तो राजकुमार जणू
प्रत्यक्षात माझ्या सामोरी यावा
असे काहीसे वाटायला लागले होते ।।
पण एका क्षणातच ते सोनेरी स्वप्न भंगले
आणि कोरड्या सत्याची जाणीव झाली
तो चेहरा पण आता दिसेनासा झाला
फक्त माझ्या चेहरयावर तेच हास्य देऊन गेला ।।
अश्विनी अवतारे,नागपूर