Sunday 18 January 2015

हेतू




का कसे कुठून हे प्रेम 
असे अजाणता  होई 
वेडे मन हे माझे  
नकळत त्याचा हि  शोध  घेई 


वाहणाऱ्या पवानाच्या ओघाला 
हि वेडं मन का विचारे 
कसली हि घालमेल 
सोडवू कशी आता  सांगणारे 


सळसळत्या वाहत्या लाटेला  
हे का प्रश्न करी  
तुझी दिशा त्या सागरी किनारी 
मग  माझी  नजर  कुणासाठी  गं  बावरी 


तर कधी एकांतात असलेल्या वाटेला 
अबोल राहून पाही 
का इतकी शांत तू 
कि कुण्या वाटसरूची  वाट  हाच  तुझा  हेतू ..
………कि ........... फक्त हाच तुझा  हेतू