Sunday, 6 March 2016

का हे जीवन असे झाले


 लोक अन्नासाठी जिव घ्यायला लागले पण जिवासाठी अन्न देण्यासाठी नकारायाला लागले....

माणूस हा समाजापेक्षा मोठा होऊन गेला आणि पैश्यासमोर येउन हरला...

प्रेमाला वाटेल ते द्यायला लागला पण खरे प्रेम करायला विसरला...

पैश्याला महत्त्व देता देता मानव मानुसकिला विसरला.....

आपले ते फ़क्त पैसे असे समजुन आपल्या जन्मदात्याला सुद्धा तो दुरावला....

असा हा मानव स्वार्थासाठी देवाचे अस्तित्व सुद्धा नाकारायला लागला.....

कोणाचे मृत्यु सन म्हणून साजरे करायला लागला तर कोणाचे बलात्कार हे मनोरंजन म्हणून फ़क्त टि व्ही वर बघायला लागला...

पैसा आला तर मी कमावला म्हननारा मानव हा गरीबित नशिबालाच कोसायला लागला...

जग एवडे पूढे गेले तरी मानव हा अजुन मागे मागे सरायला लागला ....

Thursday, 14 January 2016

तिची गोष्ट
तिची गोष्टच काही न्यारी होती ।
उन्हात चांदणे पसरावी न् गुलाबी हवेत स्वतःला झोकुन द्यावे 
इतकी ती भाबडी न् प्यारी होती ।।


एखाद्या राजकुमारी प्रमाणे होती तिची स्वप्न 
जगण्यातल्या त्रासातही त्या स्वप्नांना जपणं ।
काहातरी वेगळे होते तिच्या जगण्यात 
आयुष्यच गेले तिचे जगण्याचे कोडे उलगडण्यात ।।


कुणालाही हलकीशी भुल पाडा़वी 
असले सामर्थ्य होते तिच्या बोलक्या डोळ्यात
छोट्याश्या फुलपाखराप्रमाणे जगुनही 
पंखाविना गगनात विहरण्याचे तिचे ध्येय होते ।।


बघायला गेलें तर फक्त ती एक गुलाबाची पाकळी होती ।
किंतु रातीच्या काळ्याकुट्ट तारांगणेत 

रूपेरी चमकणारी आकाशगंगेच्या

 पहिल्या नक्षत्रासारखी ती तु  होती ।।

अश्विनी अवतारे

Tuesday, 22 December 2015

गतजन्माची ओळख

गतजन्माची ओळखआज एक अनोळखी चेहरा
 मज सांगुन गेला काही
नजरेच्या भाषेतुन थोडी गतजन्माची
 ओळख देऊन गेला काही ।।

कदाचीत इतकी शब्दात गुंतलेली मी
तुझ्या चेहरयावरचे  भाव मात्र वाचता आले नाही 
पण तुझ्या डोळ्यातील ते तेज आणि
ओठांवरचे गुलाबी स्मितहास्य माझ्यापासून लपले नाही ।।

तुझ्या त्या लाघवी हसण्यानेच
 कदाचीत मी विरघळली खरी 
क्षणभर वाटून गेले तुझी नजर 
फक्त मला बघण्यासाठीच झाली होती बावरी ।।

एखादं स्वप्न पहावे आणि 
स्वप्नातला तो राजकुमार जणू 
प्रत्यक्षात माझ्या सामोरी यावा 
असे काहीसे वाटायला लागले होते ।।

पण एका क्षणातच ते सोनेरी स्वप्न भंगले 
आणि कोरड्या सत्याची जाणीव झाली
 तो चेहरा पण आता दिसेनासा झाला 
फक्त माझ्या चेहरयावर तेच हास्य देऊन गेला ।।
       
अश्विनी अवतारे,नागपूरMonday, 8 June 2015

" वास्तव्य "

   " वास्तव्य "

रूपकाची पाने ,सोन्याची  फुले 
प्रेमाची  लहर अन  मंद मंद झुले 
धरतीची रजई ,आकाशाचे   छत 
जीवनाचा  खेळ ते सत्याची प्रत 

पहाटेच स्वप्ने   ,,स्वप्नांना जपणे
नशिबी  यावी गडलेली रत्ने
काटा रुतणे  वाटच चुकणे 
नात्यांची ओळख  ती रत्नाची पारख 

आनंदाची  बाग ,सर्कशितला वाघ
संगीतातील राग जीवनाचा भाग
आयुष्याचे  पान  अर्थच विराण
आज उधारी उद्या  गहाण

हातात फुल कधीकधि  काडतुसे 
काल दवे  आज  दाट धुके 
शब्द शब्द वेचून  घे 
न जाने आज बोल उद्या मुके 

सत्याच्या नजरा प्रेमाचा गजरा
अबोल्यात अडखळतो प्रीतीचा मुजरा
वास्तव्याची भान ,,जगण्याची  जाण
क्षणोक्षणी मन करी बलिदान ..अश्विनी अवतारे,नागपूर

वाऱ्याची झोक

वाऱ्याची झोक

वाऱ्याची झोक आली … आणि
कानात काही तरी कुजबुज करून गेली
चोहीकडे प्रीतीची सुमने फुलली 
असा काही तरी इशारा मज करून गेली

वाऱ्याची झोक आली  , न घडीभर
तुझ्या भेटण्याची आस देऊन गेली 
अंधार दाटलेल्या माझ्या मार्गी 
एक प्रकाशाची वात देऊन गेली 

वाऱ्याची झोक आली  न  
तिच्या  संगे तुझ्या प्रेम पत्र सोडून गेली
तुझ्या विचाराने माझ्या मनाच्या माळ राणी 
मग फुलू लागल्या स्वप्नांच्या नव्या वेली

वाऱ्याची झोक आली ,,,न 
आयुष्य जगण्याचे सामर्थ्य देऊन गेली
जसे वाल्वंतात फुलराण न ग्रीष्मात 
जणू वर्ष  बरसून आली ...अश्विनी अवतारे,नागपूर

Thursday, 4 June 2015

लहानपणी चे विश्व

लहानपणी चे विश्व

लहानपनीचे ते रुपेरी विश्व स्मरत 
मनावर छेडती अलगद आठवणींचा तारा
लहानपण देगा देव मुंगी साखरेचा रवा
म्हणत मोठे झाल्यावर आता तोच सहारा

प्रत्येक गोष्टीची कशी नवलाई असे त्या वेळी
दिवसभर उल्हाडपण अन ती दंगा मस्ती होई
limlet च्या गोळ्या chocolates gems ne च
मस्तपैकी कसा खिसा भरून येई

न राही तणाव कशाचा न कशाची घाई
मनाला वाटेल तसे जगणे न कुणाची मनाई
लहानपणीच्या छोट्या छोट्या स्वप्नांनी
कशी स्वप्नमाळ मग विणली जाई

वाटेल त्याच्याशी मैत्रीचे जोडे नाते
जाती बंधनाचे नियम काय माहित होते
त्या मैत्रीचे किस्से अजूनही डोळ्या समोर
आले कि अलगद डोळे भरून येते

तो भातुकलीचा खेळ राजाराणीची कहाणी
किती तरी भांडण होई लगोरीच्या वेळी
खो-खो लंगडीची तर मजाच न्यारी
अलगद आठवणारी ती उंटावरची सवारी

लहानपणीच्या त्या आठवणीत परत रमावेसे वाटते
परत झाडावर चढून आंबे चोरावीशी वाटते
मित्र-मैत्रिणी बरोबर परत १ रुपयावाल्या garden मध्ये
जाऊन घसरगुंडी वर बागाळावेसे वाटते grin emoticon grin emoticon

छोट्या छोट्या निरर्थक गोष्टीवर
झगडा करून कट्टी करायची न मग
दो wink emoticon म्हणून मैत्री निभवायचे सुख
sorry म्हणण्यापेक्षा बरेच दिलासा देणारे होते

घरी न सांगता मैत्रिणी बरोबर ती
शाळे समोरची उकडलेली बोरे खाण्याची
मजाच काही और होती
शाळेत डबा खाताना वदनी कवळ घेता tongue emoticon
म्ह्नंयःची प्रथाच काही और होती

पहिला number आला कि कसे
सगळ्यांना जलवण्याची घाई राही
तोच हुकला कि अलगद unsure emoticon
सारे घर डोक्या वर घेऊन नाचण्याची वेळ येई

स्नेह संमेलनात कौतुक झाले म्हणून
कसे मन हरभऱ्याच्या झाडावर चढे
तेच मला madam ने भर क्लास मध्ये उभे केले
म्हनून घरी आल्यावर रडून पडे

पिकनिक ची मजा अंताक्षरी गप्पा गाणी
आज हि किती तरी गोष्टी स्मरते
त्या गमती जमती आठवताना आज
जगण्यातील पार tension च विरागळते

A for Apple n B for Ball
म्हणत जीवनाची abcd शिकून गेले
आयुष्यातील ते छोटे छोटे क्षण पकडून
वास्तव्यात जगायला शिकून गेलो

त्या बालमुठीत बंद ठेवलेला
आठवणींचा एक मोती चक्क काचेचा
मनी बनण्यासाठी सज्ज झालाय
तरी आजही आयुष्याचा त्या काळाने
अख्ख्या जीवनव्याख्ये वर मोह घातलाय wink emoticon .. अश्विनी अवतारे,नागपूर

Saturday, 23 May 2015

माय बाप

माय बाप 
माय बाप  , शब्दातच किती आपुलकी जाणवते 
मला हि अनुभवायची  आहे हि आपुलकी 
ते प्रेम ती काळजी , फक्त काही क्षण 
आणखी जगायचे आहे, काही क्षण आणखी 

इतके भरगोस प्रेम दिले मामीने 
कि मे ,, तुझ्या ममतेची कधी जाणीवच झाली नाही 
बापाच्या रागाचाही विसर पडला कधीचाच 
जेव्हा मामांच्या काल्जीनेच उरत भरून येत  असे 

परक्यानीच  सांभाळले इतके कि 
मायबापाच्या सहवासाची कधी गरज वाटली नाही 
शब्द रूपाने इतकी बोलकी झाली पण 
आई बाबा कधी स्वत : हून ओठांवर सजलेच नाही 

पडले कि आ म्हणून ओरडायची पण
अंतर मनातून आई हि हक कधीच बाहेर पडली नाही 
घाबरले कि बास  झाले  म्हणून स्वत: ला समजवायची 
पण बाबा तुम्ही हवे आहात असे कधी वाटलेच नाही 

माय बाप , आई बाबा बाराखडीत शिकले 
शब्दरूपात कवितेत रंगवूनही आणले 
पण कधी माझ्या अंतरंगातून झळकलेच  नाही 
आई बाबा असे कधी तोंडावर आलेच नाही ,
ते तसेच कवितेत उरले ...अश्विनी अवतारे,नागपूर